विशेष मुलांची खंत बाळगण्यापेक्षा स्वीकारआवश्यक!
कृतिका पद्मनाभन यांचा पालकांना सल्ला
विशेष मुलांच्या जन्माबद्दल खंत बाळगण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करून त्यांना सामान्य आयुष्य जगणे सुलभ
करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ञ कृतिका पद्मनाभन यांनी विशेष मुलांच्या
पालकांना दिला.
स्वमग्न मुलाचे संगोपन करताना सामोरे जावे लागलेल्या तणावाचा अनुभव इतर पालकांना येऊ नये यासाठी डॉ
दीप्ती बच्छाव (Dr. Dipti Bachchhaw) आणि निलेश वर्लेकर या दांपत्याच्या पुढाकाराने सुरू करण्यात
आलेल्या ‘ऑसम किड्स’ (Ausum Kids) या स्वमग्न मुलांच्या प्रशिक्षण आणि उपचार केंद्राच्या उद्घाटन
समारंभात त्या बोलत होत्या.